शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चेक पोस्टवर ड्युटी करण्यास नकार; शिक्षकास बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 16:49 IST

कोरोना संचारबंदीनिमित्ताने लावलेल्या चेक पोस्टवर ड्युटी करण्यास एका शिक्षकाने नकार दिला आहे. या शिक्षकाने मोबाईलवर तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात कुचराई व गैरवर्तन केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक शरद राऊत यांना तहसीलदार महेंद्र महाजन यांनी रविवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

श्रीगोंदा : कोरोना संचारबंदीनिमित्ताने लावलेल्या चेक पोस्टवर ड्युटी करण्यास एका शिक्षकाने नकार दिला आहे. या शिक्षकाने मोबाईलवर तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात कुचराई व गैरवर्तन केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक शरद राऊत यांना तहसीलदार महेंद्र महाजन यांनी रविवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शरद राऊत इतर काही शिक्षकांना चेक पोस्ट ड्युटी लावली. यामध्ये शरद राऊत यांना निमगाव खलू येथील चेक पोस्टवर ड्युटी लावण्यात आली होती. राऊत यांनी ड्युटी करण्यास नकार दिला. मी चेक पोस्टवर काम करणार नाही, असे तहसीलदार यांना मोबाईलवर सांगताना अरेरावीची भाषा केली. त्यानंतर तहसीलदार महेंद्र महाजन यांनी शरद राऊत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आठ दिवसात आपले लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. श्रीगोंदा तालुक्यात सुमारे एक हजार प्राथमिक ५०० माध्यमिक शिक्षक आहेत. हे शिक्षक घरी आहेत. कोरोना प्रतिबंधक मोहिमेत आरोग्य महसूल व पोलिसांवर ताण आला आहे. कोरोना मोहिमेत शिक्षकांवर मोठी जबाबदारी  कोरोना ग्रामसुरक्षा समिती व संचारबंदीचे पालन होते की नाही. कुंटुबांतील सदस्य माक्स वापरतात का? सॅनिटरीझिंग व हॅण्डवॉश चा वापर करतात का? बाहेर गावावरून नागरिक होमक्वारंटाईन आहेत का? शाळा क्वारंटाईनमधील नागरिक शाळेत राहतात का? याचा होम टु होम सर्व्हे करण्याची जबाबदारी त्या गावातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. हे काम मंगळवारपासून होणार आहे. या कामातून महिला शिक्षकांना वगळण्यात येणार आहे, अशी माहिती समजली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshrigonda-acश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्या