शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वस्त मंडळ बरखास्तीची शिफारस

By admin | Updated: June 3, 2014 00:26 IST

अहमदनगर : श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आहे.

अहमदनगर : श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आहे. या विश्वस्त मंडळात माध्यमिक शिक्षक, पत्रकार, वकील, उद्योजक, डॉक्टर, प्राध्यापक असून अंतर्गत कलह व राजकारणामुळे त्यांच्यात वाद सुरू आहेत. ते देवस्थानसाठी योग्य नाही. विश्वस्तांची वर्तवणूक पाहता व देवस्थानचे हित पाहता विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन मंडळ नेमणे योग्य वाटते, असा अभिप्राय धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या निरीक्षकांनी सादर केल्याने खळबळ उडाली आहे. देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये एकमेकांविरूध्द तक्रारी, मिटींगमध्ये वाद, पिस्तुलने एकमेकांना धमकावणे, धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता खर्च करणे, झालेल्या ठरावात बदल करणे, खोट्या सह्यांच्या आधारे रेकॉर्ड तयार करणे, मनाप्रमाणे ठराव करून घेणे, प्रासेडिंग पळविणे व त्यावर शेरे मारणे, विश्वस्तांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी देणे, कर्मचार्‍यांना धमकावणे, देवस्थानच्या रुग्णवाहिकेचा स्वत:साठी वापर करणे, त्याच रुग्णवाहीकेवर तीन महिन्यांत ३५ हजार ६८८ रुपये खर्च करणे, ठराव नसताना देवस्थानची जमीन ३० वर्षे भाडेपट्टी कराराने देणे आदी, तक्रारी होत्या. या तक्रारी संदर्भात चौकशीसाठी नगरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त डोंगरे यांनी कार्यालयीन निरीक्षक सुरकुटला, आंधळे, अवचट यांनी निरीक्षक म्हणून पाठवत सर्व माहिती घेतली. या निरीक्षकांनी सविस्तर अहवाल तयार करून विद्यमान विश्वस्त बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, निरीक्षकांच्या अहवालानंतर धर्मादाय आयुक्तांनी आदेश काढत विश्वस्त मंडळाला नोटीस काढली आहे. यात देवस्थानच्या हितासाठी सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा अहवाल धर्मादाय विभाग पुणे यांच्याकडे का पाठविण्यात येऊन याबाबत येत्या ७ जून पर्यंत खुलासा विचारण्यात आलेला आहे. त्या खुलाशावर ११ जूनला सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.