शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पुराने वेढलेल्या सरला बेटातून रामगिरी महाराज अखेर बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 18:56 IST

येवला येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी निघालेले सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज गोदावरीच्या पुराने वेढा दिल्याने बेटावरच अडकले.

श्रीरामपूर - येवला येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी निघालेले सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज गोदावरीच्या पुराने वेढा दिल्याने बेटावरच अडकले. महाराजांनी प्रशासनावर खापर फोडत आपल्याला बोटीतून उतरवून दिल्याने निषेध केला. अखेर स्वत:च्याच बोटीने धोकादायकरित्या प्रवास करीत पुराचा वेढा पार केला. सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रसंगामुळे महाराजांच्या भक्त परिवारातून संताप व्यक्त केला जात आहे. श्रीरामपूर व वैैजापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या येथील सराला बेट येथे हा प्रकार घडला. गोदावरी नदीला सोडण्यात आलेल्या पावणे तीन लाख क्युसेक पाण्यामुळे बेटाला दोन्ही बाजूने पुराचा वेढा पडलेला आहे. त्यामुळे महंत रामगिरी हे भक्त परिवारासमवेत येथे रविवारपासूनच अडकलेले होते. त्यांनी प्रशासनावर सर्व खापर फोडले आहे.येवला तालुक्यातील तळवाडे येथे गंगागिरी महाराजांच्या १७२ वा अखंड हरिनाम सप्ताह सोमवारपासून सुरू झाला आहे. महाराजांचा नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात लाखोंचा भक्त संप्रदाय आहे. या सप्ताहाकरिता राज्यातून लाखो भाविक आले आहेत. मात्र पुरात अडकल्यामुळे सप्ताहाच्या उद्घाटनाला जाण्यास महाराजांना मोठा उशीर झाला. प्रशासनाने आपल्याला बोटीतून उतरविले. कवडीचीही मदत केली नाही. त्यामुळे सप्ताहाला लवकर जाता आले नाही. या प्रकाराचा मी निषेध करतो, तसेच अशी घटना पुन्हा घडू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया महंत रामगिरी यांनी व्यक्त केली. त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या भक्तांनीही निषेध केला. मठाच्या स्वत:च्या बोटीतून भक्तांसमवेत धोकादायकरित्या पुराच्या पाण्यातून प्रवास करत महंत रामगिरी हे वैैजापूर तालुक्याच्या हद्दीत पोहोचले.  प्रशासनाने मात्र आरोप फेटाळलेतहसीलदार प्रशांत पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी महंत रामगिरी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. प्रांताधिकारी तेजस चव्हाण, नायब तहसीलदार जयश्री गुंजाळ, पोलीस निरीक्षक व महसूलच्या कर्मचाºयांसह आपण बेटावर जाऊन महाराजांना सुखरूप सुरक्षितस्थळी येण्याची विनंती केली होती. मात्र मठातील गायी व भक्त परिवाराला सोडून आपल्याला येता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.  त्यानंतरही आम्ही विनवणी केली. मात्र पुराचे पाणी वाढल्याने आमचा नाईलाज झाला. हा सर्व प्रकार जिल्हाधिकाºयांच्याही कानावर घातल्याचे ते म्हणाले.  महंत रामगिरी यांचे शिष्य मधू महाराज यांनी सोमवारी ऐनवेळी हेलिकॉप्टरची परवानगी मागितली होती. मात्र ऐनवेळी ती देणे शक्य नव्हते. जिल्हाधिकारी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणार होते. मात्र तत्पूर्वीच महाराजांनी स्वत:च्या बोटीतून प्रवास सुरू केला. मी एनडीआरएफची टीम तातडीने रवाना केली. ही टीम महाराजांच्या बोटीसोबतच होती. ते सुखरूप बोटीतून बाहेर पडेपर्यंत मोबाईलवर संपर्कात होतो.-प्रशांत पाटील, तहसीलदार, श्रीरामपूर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस