पारनेर : कांदा, डाळिंब व इतर पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता निघोजसारख्या भागात संत्री फळाचे उत्पादन घेण्याचा अभिनव प्रयोग रसाळवाडी येथील भिवा रसाळ यांनी यशस्वी केला आहे. शिवाय तज्ज्ञांच्या मदतीशिवाय निर्यातक्षम संत्रींचे उत्पादन घेण्याची किमया रसाळ यांनी साधली असून, सुमारे दोन ते तीन टन संत्री आखाती देशात निर्यात केली जात आहे.निघोज (ता़ पारनेर) येथील रसाळवाडी परिसरात भिवा रसाळ यांची शेती आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी पारंपरिक कांदा, ऊस या पिकांना फाटा देऊन संत्री व डाळिंबाची लागवड करण्याचे ठरविले. मात्र, बाबाशेठ कवाद यांनी कृषी विभागाच्या फलोत्पादन योजनेची माहिती दिली़ त्यानुसार रसाळ यांनी पाच एकर क्षेत्रावर संत्रीची ११५० झाडे लावली. यात डाळिंबाचे आंतरपिक घेतले. संत्रीची लागवड करताना १३ बाय १३ अशा अंतरावर झाडे लावली. त्यासाठी कुकडी नदीवरुन सुमारे तीन किलोमीटरवरुन पाणी आणले. तीन विहिरी घेतल्या. पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करुन ठिबक सिंचनाचा वापर केला. संत्र्याचे व डाळिंबाचे अंतर्गत काम करण्यासाठी खूप माणसांची गरज असते. मग भिवा रसाळ यांची मुले शंकर, शिवाजी, साहेबराव तसेच खंडू नामदेव रसाळ व भास्कर रसाळ यांनी स्वत:च त्यात लक्ष घालण्याचे ठरविले. व एकत्रित शेती सुरु केल्याने बाहेरील कामगार बोलवावे लागले नाही. तर कुटुंबातील बीजाबाई शंकर रसाळ, सविता शिवाजी रसाळ, अलका साहेबराव रसाळ, मनीषा खंडू रसाळ, अर्चना भास्कर रसाळ यांनी मोलाची मदत करताना दररोज मशागतीची जबाबदारी घेतली.(तालुका प्रतिनिधी)
आखाताला भावली रसाळवाडीची संत्री
By admin | Updated: September 21, 2014 23:49 IST
पारनेर : कांदा, डाळिंब व इतर पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता निघोजसारख्या भागात संत्री फळाचे उत्पादन घेण्याचा अभिनव प्रयोग रसाळवाडी येथील भिवा रसाळ यांनी यशस्वी केला आहे.
आखाताला भावली रसाळवाडीची संत्री
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}