राधाकृष्ण विखे होणार मंत्री? मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 14:58 IST2019-06-15T14:53:45+5:302019-06-15T14:58:31+5:30

उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Radhakrishna vikhe minister? | राधाकृष्ण विखे होणार मंत्री? मुंबईकडे रवाना

राधाकृष्ण विखे होणार मंत्री? मुंबईकडे रवाना

अहमदनगर : उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राधाकृष्ण विखे आज उशीरा मुंबईला रवाना होणार आहेत. कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत मात्र उत्सुकता आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. विस्तारामध्ये नवीन ७ आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या कोट्याला ४ तर भाजपच्या कोट्यात ३ मंत्रिपदे मिळतील असा अंदाज आहे. भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे, अकलूजचे रणजितसिंह मोहिते यांची मंत्रिपदे निश्चित मानली जात आहेत. याशिवाय भाजप कोट्यातून आठवले गटालाही मंत्रिपद दिले जाणार आहे. तसेच शिवसेनेच्या कोट्यातून बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेच्या कोट्यातून आणखी तीन मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस असून ते उशीरा मुंबईसाठी रवाना होतील. आज सकाळी त्यांनी लोणी येथील म्हसोबा महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. आज उशीरा ते मुंबईला रवाना होणार आहेत.

 

Web Title: Radhakrishna vikhe minister?