ग्रामीण भागात लवकरच दर्जेदार आराेग्य सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:52+5:302021-02-05T06:34:52+5:30

श्रीगोंदा : राज्यात आरोग्य सेवकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने राज्यात मेडिकल काॅलेजला मान्यता देण्याचे धोरण राज्य शासनाने घेतले आहे. त्यामुळे ...

Quality health facilities soon in rural areas | ग्रामीण भागात लवकरच दर्जेदार आराेग्य सुविधा

ग्रामीण भागात लवकरच दर्जेदार आराेग्य सुविधा

श्रीगोंदा : राज्यात आरोग्य सेवकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने राज्यात मेडिकल काॅलेजला मान्यता देण्याचे धोरण राज्य शासनाने घेतले आहे. त्यामुळे लवकरच ग्रामीण भागात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण होतील, अशा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा येथील डॉ. उत्तम वडवकर व डॉ. संदीप पाटील यांच्या निरामय हाॅस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निरामय हाॅस्पिटलमध्ये सर्व सुविधा आहेत. हे हाॅस्पिटल श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला चांगली सेवा देईल, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.

यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र फाळके, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, केशव मगर, राज देशमुख, दीपक भोसले, स्मितल वाबळे, बाळासाहेब दुतारे, बापू गोरे, प्रशांत गोरे, अशोक खेंडके आदी उपस्थित होते. स्वागत डॉ. उत्तम वडवकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. संदीप पाटील यांनी केले. राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी आभार मानले. श्रीगोंदा शहरात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. तुमची तब्येत बरी आहे ना, काळजी घ्या, असेही पवार यावेळी पाचपुतेंना म्हणाले.

फोटो : ३० निरामय

श्रीगोंदा येथे निरामय हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवर.

Web Title: Quality health facilities soon in rural areas