शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठ कुलगुरूंनी योगाबाबत निर्णय मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना एका योग संस्थेच्या माध्यमातून योग शिकवण्याचा आदेश पुणे विद्यापीठाचे ...

पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना एका योग संस्थेच्या माध्यमातून योग शिकवण्याचा आदेश पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी नुकताच काढला आहे. यासाठी विद्या परिषदेची परवानगी कुलगुरूंनी घेतलेली नाही. शिवाय त्यात पाच गुण विद्यार्थ्यांना ग्रेस म्हणून दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. या गोष्टीला नाशिक, अहमदनगर येथून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. कारण यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला जाईल. शिवाय मध्यंतरी या योग संस्थेच्या योग गुरुने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे कुलगुरूंनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, कुलगुरू पदाचा आम्ही नेहमीच आदर करतो, पण त्या पदावरील व्यक्ती जर छत्रपतींचा अवमान करत असतील तर आम्ही त्या विरोधात संघर्ष उभा करू. शासनाने सुद्धा याबाबतीत लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी.

दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ उपकेंद्रात याबाबत निवेदन दिले. यावेळी इतिहास प्रेमी योगेश गागरे आणि इतर शिवप्रेमी उपस्थित होते.

----------

फोटो

०९स्मायलिंग अस्मिता

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काढलेला योगाबाबतचा आदेश मागे घेण्याबाबतचे निवेदन स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्रात देण्यात आले.