शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जनसेवाचा पॅनल गुलदस्त्यात

By admin | Updated: November 20, 2014 14:23 IST

सत्ताधारी सहकार पॅनलमधील उमेदवार जाहीर झाले असले तरी विरोधी गटाच्या जनसेवा पॅनलचे उमेदवार निश्‍चित करण्यासाठी पॅनेलच्या नेत्यांची तारांबळ उडाली आहे.

 अहमदनगर : सत्ताधारी सहकार पॅनलमधील उमेदवार जाहीर झाले असले तरी विरोधी गटाच्या जनसेवा पॅनलचे उमेदवार निश्‍चित करण्यासाठी पॅनेलच्या नेत्यांची तारांबळ उडाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पॅनेलमधील उमेदवार जाहीर करणार असल्याची भूमिका जनसेवाच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान बुधवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली असून ८३ पैकी ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ८३ उमेदवारांनी १४६ अर्ज दाखल केले होते. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची अर्बन बँकेच्या सभागृहात छाननी झाली. पुणे येथील विभागीय उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव खडके आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एम.जी. गायकवाड यांनी अर्जांची छाननी केली. छाननीसाठी सहकार आणि जनसेवा पॅनेलमधील उमेदवार हजर होते. १८ जागांसाठी ८३ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये तीन जणांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झाले ते तिन्ही उमेद्वार खासदार दिलीप गांधी यांच्या गटाचे उमेदवार आहेत. सुनील कुलकर्णी, सोपान पंडित आणि प्रविण पाचरणे या तिघांचे अर्ज बाद झाले आहेत. हे उमेद्वार गांधी गटाचे असले तरी त्यांचा पॅनेलमध्ये समावेश नव्हता. तीन अर्ज बाद झाल्याने आता ८0 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
------
■ वैध झालेल्या ८0 उमेदवारांची यादी अर्बन बँकेच्या सभागृहात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांना २0 ते २२ नोव्हेंबर या काळात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अर्ज माघारी घेता येणार आहेत. शनिवारी दुपारी दोनवाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. उमेदवारास आपली उमेदवारी मागे घेतल्याची नोटीस समक्ष अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ही नोटीस कधीही बदलता येणार नाही, तसेच रद्द करता येणार नाही, असे खडके यांनी सांगितले.
जनसेवाचे नेते
■ विरोधकांच्या जनसेवा पॅनेलला नेत्यांची संख्या जास्त झाली आहे. जनसेवा पॅनेलकडून इच्छुक असलेल्यांची संख्या ३४ झाली आहे. त्यामुळे पॅनल निश्‍चित करण्यास अडचणी येत आहेत.नेत्यांची संख्या जास्त असल्याने एकत्रित येऊन निर्णय घेण्यास अडथळे येत आहेत. अशोक कोठारी, सुभाष भंडारी, दीप चव्हाण, राजेंद्र गांधी, अभय आगरकर, वसंत लोढा असे हे नेते आहेत.