संगमनेर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा आणि खासगी कंपन्यांच्या ट्रॅव्हल सुरू झाल्या आहेत. रात्रीच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते आहे. संगमनेरातून मुंबई (सेंट्रल), बोरिवली, पुणे, कोल्हापूर, जोधपूर, मिरज, सांगली, सोलापूर येथे जाण्यासाठी दररोज ट्रॅव्हल्स उपलब्ध आहेत.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा आणि खासगी कंपन्यांच्या ट्रॅव्हल हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. लालपरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरीदेखील रात्रीच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते आहे. संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून नाशिक - पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. संगमनेरातून मुंबई (सेंट्रल), बोरिवली, पुणे, कोल्हापूर, जोधपूर, मिरज, सांगली, सोलापूर येथे जाण्यासाठी दररोज ट्रॅव्हल्स उपलब्ध असतात. तसेच अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, लातूर, शेगाव, बंगळुरू, गोवा, हैदराबाद, इंदौर, भोपाळ, सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स उपलब्ध असून, त्यासाठी नाशिक, सिन्नर किंवा शिर्डी येथे जावे लागते. संगमनेर - नाशिक, संगमनेर - शिर्डी हे अंतर अगदी तास-दीड तासाचे असल्याने तेथे पोहोचणे सहज शक्य होते. प्रवासी संगमनेरबराेबरच इतरही ठिकाणी असलेल्या ट्रॅव्हल कंपन्यांचे कार्यालय, बुकिंग सेंटर येथून सीट बुकिंग करतात. तसेच ऑनलाईन सुविधादेखील उपलब्ध असल्याने अगदी घरबसल्या बुकिंग करता येऊ शकते. हा पर्याय प्रवाशांना सोयीचा वाटतो.
----------------
महामंडळाच्या सुरू असलेल्या रातराणी
शेवगाव-मुंबई,
पाथर्डी-मुंबई,
पाथर्डी-कोल्हापूर
तारकपूर-मुंबई,
जामखेड-मुंबई
----------
एकूण १२ स्लीपर बसेस
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, तारकपूर, जामखेड या पाच आगारात शिवशाही बसेस आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण ११ आगार असून, १२ स्लीपर बसेस आहेत. त्यात स्लीपर आणि सिटिंग असे दोन प्रकार आहेत. प्रवासभाडे माफक असून, स्लीपर आणि सिटिंगसाठी ते सारखेच आहे. या बसेसला चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच लांब पल्ल्याच्या मुंबई, सुरत, कोल्हापूर, गाणगापूर, शेगाव, पंढरपूर, परळी या बसेस सुरू असून, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो.
-----------------
शिर्डी - हैदराबाद बससेवा बंद
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, अकोले येथील पाच डेपोमधून एकही रातराणी सुरू नाही. तसेच शिर्डी - हैदराबाद, हैदराबाद - शिर्डी बससेवा सध्या बंद आहे.
--------------
नोकरीसाठी चिपळूण येथे असल्याने तेथे जाण्यासाठी ट्रॅव्हलचा प्रवास सोयीचा वाटतो. ट्रॅव्हलमधून रात्री आरामदायी प्रवास होतो. स्लीपर सीट असल्याने झोपही होते. सकाळी वेळेत चिपळूणला पोहोचतो.
- सागर सूर्यवंशी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी
---------------
नोकरीसाठी बुगळुरू येथे असल्याने अहमदनगरहून बंगळुरू येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल मिळते. ऑनलाईन पद्धतीने आधीच सीट बुकिंग करता येते. त्यामुळे वेळेची बचत होते. त्याचा फायदा होतो.
-निशा तिरवाडी, साकूर, ता. संगमनेर
-----------
फोटो नेम : १२०७२०२१ ट्रॅव्हल संगमनेर, ओळ : रात्री ११ वाजून ०८ मिनिटांनी संगमनेरात आलेली ट्रॅव्हल.
---------
फोटो नेम १२०७२०२१ संगमनेर बसस्थानक, ओळ : रात्री १० वाजून ११ मिनिटांनी संगमनेर बसस्थानकात फलाटावर एकही बस आलेली नव्हती.