शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पोतराज पुत्राने ओढला परिस्थितीवर आसूड

By admin | Updated: June 18, 2014 01:23 IST

कर्जत : वर्षातील दहा महिने गावोगाव दारोदार जाऊन मरिआईचा रथ डोक्यावर घेऊन, अंगावर कोडे मारून उपजीविका करणाऱ्या माता- पित्याच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले.

कर्जत : वर्षातील दहा महिने गावोगाव दारोदार जाऊन मरिआईचा रथ डोक्यावर घेऊन, अंगावर कोडे मारून उपजीविका करणाऱ्या माता- पित्याच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. शिवाय दामोदर एका डोळ्याने अंध आहे. त्याच्या या यशाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच.इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. कर्जत येथील समर्थ विद्यालयाचा दामोदर दुर्गाप्पा पवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.दामोदर पवार हा मुळचा राहणार पेनूर, ता.मोहळ, जि.सोलापूर येथील आहे. तो भटक्या समाजातील आहे. त्याचे आई-वडील उपजीविकेसाठी वर्षातील दहा महिने बाहेर गावीच असतात. मुलगा शिक्षणात हुशार आहे मग त्याला कोठे ठेवायचे हा प्रश्न त्याच्या आई-वडिलांना पडला. दामोदरचे मामा आमदार राम शिंदे यांचे अंगरक्षक होते. त्यांच्या शिफारशीने त्याला समर्थ विद्यालयात घातले व सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये प्रवेश दिला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण घेतले. दहावीत ९० टक्के गुण मिळवले. दामोदर एका डोळ्याने अंध आहे हे विशेष. या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल मुख्याध्यापकांनी पाहिला. दामोदरचा पहिला नंबर आला आहे ही बाब त्यांनी संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत व वस्तीगृहाचे अधीक्षक लालासाहेब वाघमारे यांच्या कानावर घातली. या बातमीने सर्वांनाच आनंद वाटला. सर्वांनी दामोदरला शाबासकीची थाप दिली.प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत यश मिळाले. त्याचे हे यश त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रूतून दिसत होते. (तालुका प्रतिनिधी)