पोलिसांनी पिंजून काढला नगर तालुका
By Admin | Updated: May 22, 2014 00:03 IST2014-05-21T23:56:06+5:302014-05-22T00:03:52+5:30
अहमदनगर : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले तांदळाचे व्यापारी निलेश बोरा यांचा शोध घेण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने नगर तालुका, एम.आय.डी.सी. परिसर अक्षरश: पिंजून काढला

पोलिसांनी पिंजून काढला नगर तालुका
अहमदनगर : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले तांदळाचे व्यापारी निलेश बोरा यांचा शोध घेण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने नगर तालुका, एम.आय.डी.सी. परिसर अक्षरश: पिंजून काढला. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांचा कोणताही शोध लागला नव्हता. बोरा हे रविवारी राहुरी येथे गेले होते. तेथून ते परत आलेच नाहीत. त्यांच्याशी त्यांच्या पत्नी तृप्ती बोरा या मोबाईलवरून संवाद साधत असताना त्यांचा मोबाईल अचानक बंद झाला होता. त्यानंतर ते घरी आले नाहीत. तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बेहराणी यांच्या पथकाने तपास केला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. बोरा यांच्या बंद असलेल्या मोबाईलचे लोकेशन एम.आय.डी.सी. परिसरात असल्याने याच भागात पोलिसांनी तपास केला. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नाही.