मेजर बाबाच्या पत्नीस १७ पर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:08 IST2018-08-15T05:08:08+5:302018-08-15T05:08:22+5:30

मेजर बाबा म्हणून ओळखला जाणारा बबन सीताराम ठुबे (६६) यास पारनेर न्यायालयाने सोमवारी १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याची पत्नी लता हिलाही मंगळवारी न्यायालयाने १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

 Police custody to Major Baba's wife till 17th | मेजर बाबाच्या पत्नीस १७ पर्यंत पोलीस कोठडी

मेजर बाबाच्या पत्नीस १७ पर्यंत पोलीस कोठडी

पारनेर (जि. अहमदनगर) : लिंग बदलाचा दावा करणारा कान्हूरपठार (ता. पारनेर) येथील मेजर बाबा म्हणून ओळखला जाणारा बबन सीताराम ठुबे (६६) यास पारनेर न्यायालयाने सोमवारी १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याची पत्नी लता हिलाही मंगळवारी न्यायालयाने १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
बबन ठुबे याला सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या पत्नीलाही त्याच दिवशी सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले होते. मंगळवारी दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. माधव सोनावळे, अण्णा सोनावळे, सुनीता खोडदे, विजय ठुबे हे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title:  Police custody to Major Baba's wife till 17th

टॅग्स :jailतुरुंग