दोनदा एटीएफ फोडण्याचा प्रयत्न; पळत असताना गाडी उलटली अन्..., अहिल्यानगरमध्ये सिनेस्टाईल चोरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 20:04 IST2025-07-26T20:00:01+5:302025-07-26T20:04:06+5:30

अहिल्यानगरमध्ये पळून जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडलं.

Police arrest suspect for ATM break in in Ahilyanagar Cinestyle | दोनदा एटीएफ फोडण्याचा प्रयत्न; पळत असताना गाडी उलटली अन्..., अहिल्यानगरमध्ये सिनेस्टाईल चोरी घटना

दोनदा एटीएफ फोडण्याचा प्रयत्न; पळत असताना गाडी उलटली अन्..., अहिल्यानगरमध्ये सिनेस्टाईल चोरी घटना

Ahilyanagar Crime: दोन वेळा श्रीरामपूरमधील बेलापरच्या कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित तीन आरोपींचा पोलिसांनी कान्हेगाव रस्त्यावर सिनेस्टाईल पाठलाग केला. पोलिस पाठलाग करत असल्याने सुसाट निघालेल्या आरोपींचे चारचाकी वाहन एका खड्ड्यात उलटले. या तिघांनाही नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

बेलापूर येथील कोल्हार चौकातील एटीएम दोनवेळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. एका निळ्या रंगाच्या मारुती गाडीमध्ये आलेल्या काही इसमांनी हे एटीएम फोडल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत होते. आरोपींनी पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्लॅन बनविला. पूर्ण गावाचा सर्व्हे करून बाजार तळाजवळ ते थांबले होते. ही बाब गावातील एका सूज्ञ नागरिकाने बेलापूर पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांना कळविले. पोलिसांना ओळखल्यामुळे संबंधित व्यक्तींनी ती गाडी वेगाने पळवली. हे लक्षात येतात नंदकिशोर लोखंडे यांनी बेलापूर पोलिस स्टेशनला असलेले पोलिस कॉन्स्टेबल भारत तमनर यांना सदर गाडीचा पाठलाग करण्यास सांगितले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव तसेच हवालदार बाळासाहेब कोळपे यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. आरोपींनी गाडी पढेगातकडे वळवली. आरोपींची गाडी लाडगाव चौकीच्या मागे असताना त्यांना पुढे एक मिरवणूक आडवी आली. त्यामुळे त्यांना गाडी हळू चालवावी लागली. पोलिस गाडीजवळ पोहोचणार तोच त्या गाडीने पुन्हा वेग वाढविला आणि लाडगाव कान्हेगाव चौकीजवळ वेगाने गाडी चालवत असताना आरोपींचा तोल गेला व गाडी एका खड्यात उलटले. तोपर्यंत पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी गाडीत असलेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रस्त्याने त्या गाडीने काही नागरिकांना जखमी केल्यामुळे नागरिकही त्या गाडीचा पाठलाग करत होते.

तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यावेळी आरोपीकडे बनावट पिस्तुल, दोरी लोखंडी, टॉमी, काळे गॉगल, काळे कपडे, मास्क असे साहित्य सापडले. तसेच एका प्लास्टिक कॅनमध्ये पेट्रोलही होते. तिनही आरोपी श्रीरामपुर येथील आहेत. त्यात दिपक गोपाल देवांगण व सम्यक विजय मुगदिया यांचा समावेश असुन तिसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचे पोलीसांनी सांगीतले.

Web Title: Police arrest suspect for ATM break in in Ahilyanagar Cinestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.