वाळू, मुरूम वाहतूक करणारे पोकलेन, ढंपर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:48 IST2021-02-14T18:46:40+5:302021-02-14T18:48:12+5:30

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे वाळूचा अवैध साठा करून वाळू वाहतूक व भरणा करणारा पोकलेन, एक ट्रॅक्टर आणि मुरूमाची वाहतूक करणारा ढंपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी दुपारी पकडले. यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Poklen, who smuggled sand, pimples, caught the damper | वाळू, मुरूम वाहतूक करणारे पोकलेन, ढंपर पकडले

वाळू, मुरूम वाहतूक करणारे पोकलेन, ढंपर पकडले

पारनेर : तालुक्यातील वासुंदे येथे वाळूचा अवैध साठा करून वाळू वाहतूक व भरणा करणारा पोकलेन, एक ट्रॅक्टर आणि मुरूमाची वाहतूक करणारा ढंपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी दुपारी पकडले. यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

शनिवारी तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, मंडलाधिकारी पवार, दत्ता गंधाडे, परमेश्वर राजुरे यांचे पथक फिरत असताना वासुंदे परिसरात एका ठिकाणी वाळूचा केलेल्या ढीग वरून पोकलेन च्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी अशोक पाराजी वाळूंज, रा. काकणेवाडी याचाच पोकलेन व ट्रॅक्टर असल्याचे उपस्थितांनी सांगितले. शासकीय नियमानुसार पोकलेनला सात लाख रूपये व ट्रॅक्टरला दोन लाख रूपयांचा दंड होऊ शकतो. तर दुसरीकडे एका ढंपरने मुरूम वाहतूक करताना दिसला. तो ढंपर तहसीलदार देवरे यांनी पकडला. तो ढंपर सार्थक बंडे यांचा असल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title: Poklen, who smuggled sand, pimples, caught the damper