शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक खड्ड्यात राष्ट्रीय वारकरी परिषदेतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव ते बेलवंडी फाटा रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष ...

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव ते बेलवंडी फाटा रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी श्रीगोंदा तालुका राष्ट्रीय वारकरी परिषदेतर्फे बुधवारी सकाळी धोकादायक खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष सारंग महाराज दंडवते, तालुकाध्यक्ष दादा महाराज ढवळे, समन्वयक दादा महाराज तांबे, उपाध्यक्ष अरुण महाराज जाधव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण केले.

मंगळवारी सुरेगाव येथील संजय रामफळे, पत्नी आशा रामफळे व मुलगा वेदांत हे पुण्याला दुचाकीवर निघाले होते. कौठाळे मळ्याजवळ पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांचा अपघात झाला. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र कौठाळे, संतोष महाराज कौठाळे, विकास कौठाळे, श्रीकांत कौठाळे, सुरेश कौठाळे यांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले.

या अगोदर दुचाकीवरील तरूण खड्ड्यात वाहन आदळून जबर जखमी झाले होते. सारंग दंडवते यांच्या वाहनाला एकजण खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाठीमागून धडकला. खड्डा चुकविताना एक ट्रक दुसऱ्या वाहनाला पाठीमागून धडकल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले. अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत.

या मार्गावर सातत्याने ढवळगाव फाटा, देवदैठण येथील कौठाळे वस्ती, आंबराई, राजापूर फाटा, लांडग्याचा ओढा येथे ठराविक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत आहेत. या मार्गावरील पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवावे, अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा वारकरी परिषद, पं.स. सदस्या कल्याणी लोखंडे, सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पूजा बनकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेंद्र कौठाळे, कुकडीचे संचालक सुभाष वाघमारे, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, उद्योजक अतुल लोखंडे, उद्योजक वसंत बनकर, हिंगणीचे माजी उपसरपंच संदीप तरटे, उद्योजक सर्जेराव कौठाळे यांनी दिला आहे.

---

ढवळगाव-बेलवंडी फाटा मार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली आहे. रस्ता दुरुस्तीचे टेंडर नोव्हेंबरपर्यंत निघेल. मात्र तोपर्यंत मोठेमोठे खड्डे बुजविण्याची व्यवस्था लवकरच करू.

अरविंद अम्प्लेकर,

उपअभियंता, सां. बा. विभाग, श्रीगोंदा

-----

२१ देवदैठण

ढवळगाव-बेलवंडी फाटा दरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करताना वारकरी परिषदेचे सदस्य.

210721\img-20210721-wa0041.jpg

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील अपघातातील दुचाकी व वारकरी परीषदेतर्फे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वृक्षारोपण केले .( छायाचित्र - संदीप घावटे )