पिंपळगाव खांड तलाव ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:17 IST2020-07-03T13:15:47+5:302020-07-03T13:17:13+5:30
अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरला आहे.

पिंपळगाव खांड तलाव ओव्हरफ्लो
अकोले : अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरला आहे.
६०० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने मुळा नदी वाहती झाली आहे. मुळा नदीवरील आंबित लघूपाटबंधारे तलाव यापूर्वीच ओसंडून वाहू लागला आहे. पिंपळगाव खांड तलावात १० जूनपासून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती.
१८ जूनला मुळा नदीवरील अकोले-कोतूळ रस्त्यावरील पूल पुन्हा पाण्याखाली गेला व रस्त्यावरील वाहतूक बंद झाली
होती.