पेट्रोल पंपासमोर मालमोटारीने घेतला पेट; कोल्हार येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:36 IST2020-03-06T11:35:07+5:302020-03-06T12:36:29+5:30

कोल्हार-बाभळेश्वर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर साखरेच्या पोत्याने भरलेल्या मालमोटारीने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पेट घेतला. 

Petrol taken by Malmotari in front of a petrol pump; Events at Kolhar | पेट्रोल पंपासमोर मालमोटारीने घेतला पेट; कोल्हार येथील घटना 

पेट्रोल पंपासमोर मालमोटारीने घेतला पेट; कोल्हार येथील घटना 

कोल्हार : कोल्हार-बाभळेश्वर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर साखरेच्या पोत्याने भरलेल्या मालमोटारीने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पेट घेतला. 
कोल्हार-बाभळेश्वर  रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळी असते. या रस्त्यावरुन जाणारी साखरेचे पोते असलेली मालमोटार कोल्हार-बाभळेश्वर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी मोलमोटारीचा टायर फुटला. त्यानंतर इंधन गळती होऊन मालमोटारीने पेट घेतला. मालमोटारीत साखरेची पोती असल्याने साखर विरघळायला सुरवात झाली. त्यामुळे आग आणखी भडकली. 
आग भडकू लागल्याने पेट्रोल पंप कर्मचारी, नागरिकांनी तातडीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्निशामक बंब दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आली. क्रेन आणि जेसीबीच्या सहायाने मालमोटार पेट्रोलपासासून दूर ओढण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटन टळली. 
 

Web Title: Petrol taken by Malmotari in front of a petrol pump; Events at Kolhar