शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात कोल्हेंचे शक्ती प्रदर्शन

By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST

कोपरगाव : आपण भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला,

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मुख्य रस्ते, ऐरणीवर असणारा पाणीप्रश्न व मागील दहा वर्षात इतर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आपण भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला, असे प्रतिपादन स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी केले़स्रेहलता कोल्हे यांनी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कोल्हे पत्रकारांशी बोलत होत्या़ यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र बोरावके, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, शहरप्रमुख भरत मोरे, रिपाइंचे दीपक गायकवाड, संजीवनीचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे, शिवाजीराव वक्ते, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, विवेक कोल्हे आदी कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़कोल्हे यांनी सर्वप्रथम डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला़ त्यानंतर जनसमुदायाच्या रॅलीसह उमेदवारी अर्ज दाखल केला़ कोल्हे म्हणाल्या, केंद्रात भाजपाचे सरकार आहे़ राज्यातही भाजपाचेच सरकार येणार आहे़ या तालुक्याची दहा वर्षात अत्यंत धूळधाण झाली़ येथील थांबलेल्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांनी मतदारसंघातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी तसेच अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मतदारसंघातील ऐरणीवर आलेला पाणी व वीज प्रश्न सोडविण्याकामी येणाऱ्या भाजपा सरकारच्या माध्यमातून प्राधान्यक्रम दिला जाईल, असेही सांगितले म्हणून आजचा हा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी) पहिली महिला आमदार होणारअर्ज दाखल केल्यानंतर बिपीन कोल्हे म्हणाले, या मतदार संघातून अद्यापपर्यंत एकाही महिलेला आमदारकीची संधी मिळालेली नव्हती़ महिलांचेही असंख्य प्रश्न असतात, म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वांच्या संमतीने स्नेहलता कोल्हे यांना भाजपाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरविले आहे़