पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST2021-06-17T04:15:36+5:302021-06-17T04:15:36+5:30

श्रीरामपूर : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. ...

Of the People's Republican Party | पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे

श्रीरामपूर : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. दरवाढ मागे घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ, शहराध्यक्ष रमजान शेख, सरचिटणीस भीमराव शिरसाठ, सतीश मकासरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. पक्षाच्यावतीने बुधवारी राज्यभर या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

कोरोनामुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सरकारने इंधन दरवाढ केली आहे. जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे जीवन जगणे असह्य बनले आहे. महागाईविरोधी भावना लक्षात घेऊन तातडीने दरवाढ नियंत्रित करून दिलासा द्यावा, अशी मागणी पक्षाने केली आहे.

निवेदनावर सुरेश धुरिया, भगवान रोकडे, योगेश ससाणे, बाळासाहेब यादव, जावेद काझी, भजन नागपाल, बाळासाहेब महांकाळे, वजीर सय्यद आदींच्या सह्या आहेत.

---------

Web Title: Of the People's Republican Party