शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

मोर घटले....काळवीट वाढले

By admin | Updated: June 23, 2016 01:23 IST

अहमदनगर : भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोरांची संख्या जिल्ह्यात कमालीची घटली असून, वनविभागाने केलेल्या वन्यप्राणी सर्वेक्षणात दहा

अहमदनगर : भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोरांची संख्या जिल्ह्यात कमालीची घटली असून, वनविभागाने केलेल्या वन्यप्राणी सर्वेक्षणात दहा वनपरीक्षेत्रात अवघे १७० मोर तर १७ लांडोर आढळून आल्या आहेत़ मागील वर्षीच्या तुलनेत काळवीट, लांडगे आणि कोल्ह्यांची संख्या वाढलेली दिसते़ ससे, माकड आणि रानमांजर हे प्राणी तुलनेने कमी आढळून आले आहेत़ वनविभागाने मे महिन्यात श्रीगोंदा, श्रीगोंदा रोहयो,राहुरी, पारनेर, कोपरगाव रोहयो, मिरजगाव रोहयो, कर्जत, अहमदनगर, टाकळी ढोकेश्वर, पाथर्डी, तिसगाव आदी अकरा वनपरीक्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना केली़ दोन दिवस दिवसभरात आणि रात्री पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची टेहाळणी करत ही गणना करण्यात आली़ वनक्षेत्रात झालेली घट, दुष्काळ, मानवी हस्तक्षेप, शिकारीचे वाढलेले प्रमाण आदी कारणांमुळे मोरांसह ससे, रानमांजर,घोरपड, वानर व माकडांची संख्या कमालीने घटली आहे़ अकरा वनपरीक्षेत्रात दोन दिवसांत २३८५ काळवीट आढळून आले असून, सर्वाधिक ७०० काळवीट कर्जत तालुक्यात आढळून आले आहेत़ जिल्ह्यातील प्रत्येक वनपरीक्षेत्रात उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केले जातात़ ४८ तासांत प्राणी एकदा तरी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात़ यावेळी त्यांची तेथे उपस्थित असलेले वनकर्मचारी त्यांची प्रजातीनिहाय गणना करतात़ वन्य प्राणी सर्वेक्षणात वनकर्मचाऱ्यांना पारनेर तालुक्यात दोनच बिबटे दिसून आले़ अकोले आणि संगमनेर तालुक्यात बिबट्यांची सर्वाधिक संख्या आहे़ त्या तुलनेत दक्षिण भागात येणाऱ्या वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या कमी झाली आहे.