शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात पारनेरकरांना दुष्काळी झळा

By admin | Updated: August 5, 2016 23:44 IST

पारनेर : आॅगस्ट उजाडला तरी अजूनही अपुऱ्या पावसामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे २२३ तलाव कोरडेठाक आहेत.

पारनेर : आॅगस्ट उजाडला तरी अजूनही अपुऱ्या पावसामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे २२३ तलाव कोरडेठाक आहेत. अनेक गावांना वरदान ठरणारे मांडओहोळ प्रकल्प, काळू प्रकल्प व हंगा तलावातही अत्यल्प पाणीसाठा असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यावर ऐन पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट पसरले आहे.पारनेर तालुक्यात दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाणच अत्यल्प आहे. गेल्यावर्षी शेवटच्या अवकाळी पावसाने पारनेरसह तालुक्याला थोड्या प्रमाणात तारले होते. मात्र यंदा जून,जुलै संपून आॅगस्ट महिना उजाडला तरी अजुनही पावसाचे दमदार आगमन झाले नसल्याने पारनेर शहर, लोणी हवेली, हंगा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या हंगा तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. तर तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणाऱ्या मांड ओहोळ प्रकल्पातही पाणीसाठा खालावलेलाच असल्याने भविष्यात टाकळी ढोकेश्वरसह कर्जुले हर्या, सावरगाव, पळसपूर, पोखरी व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तर ढवळपुरीजवळील काळू प्रकल्पातही कमी पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे भाळवणी,ढवळपुरी या गावांची पाणीपुरवठा योजना संकटात सापडण्याची शक्यता आहे. ढोकीमधील दोन तलावही कोरडेठाक आहेत. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे.(तालुका प्रतिनिधी)