पिंपळवाडी गावात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:31+5:302021-02-05T06:35:31+5:30

तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ...

Outbreak of corona in Pimpalwadi village | पिंपळवाडी गावात कोरोनाचा उद्रेक

पिंपळवाडी गावात कोरोनाचा उद्रेक

तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे आदींनी पिंपळवाडीला भेट देऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत.

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून, शनिवारी (दि.३०) पुणतांबा व राहाता आरोग्य केंद्रात सर्वांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

दरम्यान, गावाने स्वयंस्फूर्तीने चार दिवसांचा लॉकडाऊन सुरू केला आहे. या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी सांगितले.

पंचक्रोशीतील नागरिकांचा शिर्डीशी दैनंदिन संपर्क असतो. पिंपळवाडीबरोबरच शिर्डीलगत असलेल्या गावातही कोरोनाने आपले बस्तान परत मांडल्याच्या वृत्ताने शिर्डीकरांची चिंता वाढली आहे.

कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

Web Title: Outbreak of corona in Pimpalwadi village