बाजारपेठ खुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:43+5:302021-06-04T04:16:43+5:30

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात अनलॉक ६ ची प्रक्रिया सुरू आहे. या निकषात नगर शहराचा समावेश होतो. ...

Open the market | बाजारपेठ खुली करा

बाजारपेठ खुली करा

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात अनलॉक ६ ची प्रक्रिया सुरू आहे. या निकषात नगर शहराचा समावेश होतो. तरीही नगर शहराला अनलॉकचा फायदा मिळत नाही. नगर शहरापेक्षा कैक पटीने जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांना दुपारी २ पर्यंत बाजारपेठ खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नगर शहरात अवघे ३६ रुग्ण आहेत. जिल्ह्यात फक्त ११०० सक्रिय रुग्ण आहेतल पण जिल्ह्याची लोकसंख्या देखील ५० लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत या बाधित रुग्णांची टक्केवारी अतिशय नगण्यच आहे.

इतके सगळे असूनही जिल्हा प्रशासन, महानगरपालिका नगर शहरातील व्यवहार अंशतः सुरळीत करण्यास परवानगी देत नाहीत. यासंदर्भात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीदेखील फोनवरून बोललो आहे. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली आहे, पण अद्याप पुढे काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे आपण योग्य त्या सूचना द्याव्यात.

Web Title: Open the market