जीवनावश्यक वस्तूंसाठी केवळ चार तासच मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:14+5:302021-04-19T04:19:14+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री, महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचे नियम कडक करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ...

Only four hours allowed for essentials | जीवनावश्यक वस्तूंसाठी केवळ चार तासच मुभा

जीवनावश्यक वस्तूंसाठी केवळ चार तासच मुभा

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री, महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचे नियम कडक करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर या जनता कर्फ्यूची रविवारी रात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली. जीवनावश्यक वस्तूंसाठीही केवळ चार तासांचीच मुभा देण्यात आली आहे. या निर्बंधासह कडक लॉकडाऊन सुरू झाला असून या जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

रविवारी रात्री १२ ते १ मे २०२१ रोजी सकाळी सातपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. यापूर्वी १४ एप्रिल रोजी केलेल्या घोषणेप्रमाणे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा दिवसभर सुरू आणि शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन असे स्वरूप होते. त्यामध्ये सुधारित आदेशात बदल करून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी केवळ चार तासांचीच मुभा देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

---------

सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत हे सुरू राहील

किराणा दुकाने

दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री

भाजीपाला विक्री (फक्त द्वार वितरण)

फळे विक्री (फक्त द्वार वितरण)

अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री

कृषी संबंधित सर्व सेवा, दुकाने

पशुखाद्य विक्री

पेट्रोलपंपावर खासगी वाहनांकरिता पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅस विक्री

पेट्रोलपंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहतुकीसाठी डिझेल (नियमित वेळेनुसार)

-------

हे असेल पूर्ण बंद

हॉटेल, रेस्टारंटस्, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई

धार्मिक स्थळे पूर्णत: बंद

आठवडे बाजार पूर्णत: बंद

भाजीपाला, फळे बाजार बंद (फक्त द्वार वितरण सुरू)

दारू दुकाने पूर्णत: बंद

टॅक्सी,कँब, रिक्षा अत्यावश्यक सेवांसाठी

चारचाकी खासगी वाहने अत्यावश्यक सेवांसाठी

दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवांसाठी

सर्व खासगी कार्यालये

कटिंग, सलून, स्पा, ब्युटीपार्लर

शैक्षणिक संस्था, सर्व खासगी शिकवणी

स्टेडिअम, मैदाने

विवाह समारंभ

चहाची टपरी, दुकाने

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने

सिनेमा हॉल, नाट्यगृह, सभागृह, संग्रहालय

सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम

सेतू, ई-सेवा केंद्र, आधार केंद्र

व्यायामशाळा, स्विमिंग पूल, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक

बेकरी, मिठाई दुकाने

------------

Web Title: Only four hours allowed for essentials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.