शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या बैठकीला आठच महिला नगरसेविका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST

अहमदनगर : महापौर रोहिणी शेंडगे यांनी बोलविलेल्या महिला नगरसेविकांच्या बैठकीला केवळ आठच महिला नगरसेविकांची उपस्थिती होती. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, ...

अहमदनगर : महापौर रोहिणी शेंडगे यांनी बोलविलेल्या महिला नगरसेविकांच्या बैठकीला केवळ आठच महिला नगरसेविकांची उपस्थिती होती. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या महिला नगरसेविकांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्या पाचपैकी दोन नगरसेविकांनी मात्र बैठकीला हजेरी लावत आपल्या भागातील प्रश्न महापौरांपुुढे मांडले.

महापौरांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेत मंगळवारी पहिलीच बैठक बोलावली होती. या बैठकीला नगरसेवक असलेल्या महिलांनीच उपस्थित राहावे, असा फतवाच शेंडगे यांनी काढला होता. त्यानुसार, या बैठकीला शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णाताई गेणाप्‍पा, पुष्‍पा बोरुडे, मंगल लोखंडे, शांताबाई शिंदे, सुनिता कोतकर, कमल सप्रे, तर काँग्रेसच्या नगरसेविका संध्‍या पवार, रूपाली वारे बैठकीला उपस्थित होत्या. सुरेखा कदम, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, रीता भाकरे यांच्यासह राष्ट्रावादी, भाजप, काँग्रेसच्या तीन नगरसेविकांनी या बैठकीकडे पाठ फिरविली.

या बैठकीमध्‍ये शहरातील साफ सफाईबाबत कचरा वाहतुकीसाठी सर्व वाहने व्‍यवस्‍थित आहेत का, याची माहिती महापौरांनी या बैठकीत घेतली. शिवाजीनगर भागामध्‍ये सांडपाणी रस्‍त्‍यावर वाहत आहे. या भागात तीन ते चार दिवसांमध्‍ये पाइपलाइन टाकण्‍याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. बांधकाम विभागाचे जवळपास १२५ कामांच्या निविदा प्रक्रियेमध्‍ये आहेत. ही प्रक्रिया येत्‍या आठवड्यामध्‍ये पूर्ण होईल. स्‍वच्‍छता निरीक्षक व मुकादम यांना प्रभागामध्‍ये फिरण्‍यास सांगून साफसफाई केल्‍यानंतर नोंदवहीवर नागरिकांची स्‍वाक्षरी घेण्याबाबत महापौर शेंडगे यांनी सूचना दिल्या. सध्‍या पावसाळ्याचे दिवस असल्‍यामुळे औषध फवारणी करणे, फॉगिंग मशीन चांगल्‍या ठेवणे, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

शहर व उपनगरातील रस्‍त्‍याची पॅचिंग करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. विद्युत विभागाकडून एलईडी लाइट नवीन बसविण्याचा पोल सर्व्‍हे सुरू आहे. आतापर्यंत सात हजार पोलचा सर्व्‍हे झाला आहे. प्रत्‍येक प्रभागासाठी प्रत्‍येक सदस्‍यांना दुरुस्‍तीसाठी साहित्‍य देण्‍यात येईल. पाणीपुरवठा विभागाकडून अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना, भुयारी गटर योजना या कामाची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. यावेळी सर्व कामे पूर्ण करण्याबाबत महापौरांनी सूचना दिल्या.

--

नवजात बालकांसाठी उपचार सुविधांत अडचणी

कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍यातील सद्यस्थितीची माहिती आरोग्‍याधिकारी डॉ.सतीश राजूरकर यांनी बैठकीत सादर केली. सध्या ४० ते ५० महिला रुग्‍ण दाखल आहेत. लहान मुलांना दाखल करून घेता येते, परंतु ऑपरेशन थिएटर नसल्‍यामुळे मुलांना उपचारासाठी इतरत्र हलवावे लागते. इमारत फार जुनी झाली आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्तावही तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला महापालिकेतील सर्व विभागांतील अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते उपस्थित होते. या बैठकीत महिला नगरसेविकांनीही आपापल्या भागातील प्रश्न मांडले.

-------

फोटो- ०६महापालिका

महापौर रोहिणी शेंडगे यांनी मंगळवारी महापालिकेत पहिली बैठक घेतली. या बैठकीला महिला नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते.