शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक कारभाराच्या शिंगणापूर ट्रस्टला सूचना

By admin | Updated: December 16, 2015 23:06 IST

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टबाबत भाविकांच्या तक्रारींनंतर धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानला कारभारात पारदर्शकता आणण्याची सूचना केली आहे़

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टबाबत भाविकांच्या तक्रारींनंतर धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानला कारभारात पारदर्शकता आणण्याची सूचना केली आहे़ कर्मचारी भरती विहित पद्धतीनेच व पारदर्शी व्हावी, खर्चाचा ताळेबंद विहित नमुन्यातच सादर करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना नगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ट्रस्टला दिल्या आहेत़ सोनई आणि शिंगणापूर येथील काही स्थानिकांसह भाविकांनी देवस्थानच्या कारभाराविषयी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने देवस्थानला नुकतेच पत्र पाठविले आहे. चौकशी संदर्भ क्र. ५७/२०१५ या पत्रानुसार शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने कंपोस्ट खत खर्च व कमर्चारी मजुरी, प्राथमिक शाळा ते चौफुला रस्ता खर्च, सत्कार खर्च, मूर्ती खर्च आदी सोशल व चॅरीटेबल नसलेले खर्च ताळेबंदात दाखविले असून यापुढे त्या-त्या वर्गवारीनुसारच खर्च दाखविण्याची दक्षता घेण्यात यावी, त्याचप्रमाणे ७.५. २०१० व ५.३.२०११ च्या आदेशानुसार महसूल व वनविभागाने पानसनाला नदीपात्रात विकासासाठी परवाना दिलेला आहे़ ६ हेक्टर ५९ आऱ ही जमीन १० वर्षांसाठी १ रुपया प्रतिवर्ष भाडेपट्ट्याने वापरण्यासाठी मंजुरी दिलेली दिसून येते व त्यावर न्यासाने भाविकांसाठी सुशोभिकरणाचा खर्च केल्याचे दिसून येते़ त्यामुळे ट्रस्टने सुशोभिकरण केलेल्या जागेची नोंद न्यासाचे परिशिष्ट-१ वर घ्यावी, त्यासाठी बदल अर्ज करून धर्मादाय कार्यालयात नोंदणी करण्याविषयी या पत्रात मार्गदर्शन करण्यात आले आहे़ तसेच पानसनाला सुशोभिकरणाचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे व खर्च वाढणार नाही, याची दक्षता घेण्याविषयी सूचना दिली आहे़ कर्मचारी भरती करताना सर्व पदांच्या भरतीच्या जाहिराती वृत्तपत्रात देऊनच भरतीची विहित पद्धत निश्चित करून पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवावी, देवस्थानच्या दैनंदिन कारभारामध्ये पारदर्शकता व सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करावी, असे या पत्रात म्हटले आहे़ या पत्रातील मार्गदर्शन व सूचनांचे पालन करुन त्याचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.