शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसह दिग्गज मैदानात

By admin | Updated: September 26, 2014 00:18 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर शहरासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली़

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर शहरासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली़ आघाडी व महायुतीच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता दिग्गजांनी अर्ज दाखल केले असून, जिल्ह्यात एकाच दिवशी २९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारी अर्जाची संख्या ३४ झाली आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ गेल्या शनिवारपासून ही प्रक्रिया सुरू आहे़ परंतु आघाडी व महायुतीचा निर्णय होत नसल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी अर्ज दाखल दाखल करणे टाळले होते़ त्यात पितृ पंधरवाडा सुरू असल्याने इच्छुक निवडणूक शाखेकडे फिरकले देखील नाहीत़ अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी घटस्थापनेचाच मुहूर्त काढला असल्याची चर्चा होती़ त्यामुळे घटस्थापनेनंतर मोठ्या प्रमणात अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा होती़ अपेक्षेप्रमाणेच शहरासह जिल्ह्यातील सर्वच दिग्गज सकाळी अर्ज दाखल करण्यासाठी बाहेर पडले़ सकाळच्या सत्रात नगर शहर मतदारसंघातून सेनेकडून आमदार अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीकडून महापौर संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला़ पारंपरिक राजकीय विरोधक असलेले जगताप व राठोड यांनी एकापाठोपाठ अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली असून, काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांनीदेखील नामनिर्देशनपत्र घेतले आहे. याशिवाय भाजपाच्या वतीने माजी नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी तर अपक्ष उबेद शेख यांनीही अर्ज दाखले केले आहेत़ युतीची घोषणा झाली नसतानाही लोंढे यांनी भाजपाकडून अर्ज दाखलकेला़ शहरातून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या पाच झाली आहे़ जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि भाजपाच्या विद्यमान आमदारांनी अर्ज दाखल केले़ संगमनेर मतदारसंघातून महसूलमंत्री विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांनी दोन अर्ज दाखल केले़ शिर्डी मतदारसंघातून कृषिमंत्री राधाकृष्ण एकनाथ विखे पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले़ श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपाकडून तीन अर्ज दाखल केले असून, अकोले मतदारसंघातून पालकमंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ तसेच शेवगाव पाथर्डी- चंद्रशेखर घुले, नेवासा-शंकरराव गडाख आणि पारनेर मदारसंघातून विजय औटी यांनी अर्ज दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)संदीप कोतकरांनी घेतले अर्जकाँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांनीही चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत़ शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणात संदीप कोतकर यांना जिल्हाबंदी आहे़ असे असताना संदीप कोतकर यांनी अर्ज घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कोतकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़सत्यजित तांबे यांनी घेतला अर्जआघाडीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी नगर शहर मतदारसंघातून काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र तयारी सुरू केली आहे़ काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या ११८ उमेदवारांच्या यादीत नगर शहरातून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचेही नाव जाहीर झाले आहे़ तांबे यांनी सकाळी चार नामनिर्देशनपत्र घेतले़ तर राष्ट्रवादीचे महापौर जगताप यांनी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली आहे़ याशिवाय भाजपाकडून बाबासाहेब वाकळे ,सेनेचे आ.अनिल राठोड, डॉ़ भरत ढोकणे, अनिल पवार, बसपाकडून अशोक सोनवणे, वैभव शिंदे यांनी अर्ज घतले आहेत़सर्वसामान्यांना त्रासनगर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सावेडी उपनगरातील नगर तहसील कार्यालयात राबविली जात आहे़ अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी वेग आला़ घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार असल्याने सकाळपासूनच प्रोफेसर चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता़ त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला़ त्यात पोलिसांकडून मध्येच अडविले जात होते़ कोणतीही माहिती न देता वाहने अडविली गेल्याने नागरिक व पोलिसांत बाचाबाचीही झाली़