अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहताना राष्ट्रवादीच्या आमदाराला अश्रू अनावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:30 IST2020-08-05T17:28:19+5:302020-08-05T17:30:16+5:30
शिवसेना नेते, माजीमंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी (५ आॅगस्ट) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व.राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले.

अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहताना राष्ट्रवादीच्या आमदाराला अश्रू अनावर...
अहमदनगर : शिवसेना नेते, माजीमंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी (५ आॅगस्ट) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व. राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले.
राठोड यांच्या अंत्ययात्रेला नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना श्रध्दांजली वाहताना अश्रूृ अनावर झाले. यावेळी लंके म्हणाले, अनिलभैय्या राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. ती एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांच्या जाण्यामुळे आम्ही नगरकर पोरके झालो आहोत. नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला ताकद देण्याचे काम त्यांनी केले. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना त्यांचे आशीर्वाद मला होते.
शिवसैनिकांनी जागोजागी रस्त्यावर गर्दी केली होती. अनिल भैय्या अमर रहे... अशी घोषणाबाजी शिवसैनिक करीत होते. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.