शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनातूनच देशाची प्रगती शक्य

By admin | Updated: August 23, 2014 00:43 IST

बाभळेश्वर : युवकांच्या संशोधनाच्या माध्यमातूनच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला.

बाभळेश्वर : देशापुढे अनेक आव्हाने आहेत़ अशा परिस्थितीत देशातील युवकांच्या संशोधनाच्या माध्यमातूनच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला.येथील पद्मश्री विखेपाटील महाविद्यालय आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी डॉ. गाडे बोलत होते़ ते म्हणाले, आपला देश आजही ऊर्जा, अन्नधान्य, माहिती व तंत्रज्ञान याबाबतीत अजूनही समाधानकारक प्रगती करू शकला नाही़ परंतु या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांच्या सहभागातून असे दिसते की, आपण निश्चितच जागतिक पातळीवर संशोधनाच्या माध्यमातून प्रगतीपथावर जाऊ शकतो़ मूलभूत विज्ञानातील पायाभूत संशोधनाशिवाय देशाचा विकास अशक्य असल्याचेही डॉ़ गाडे म्हणाले़जर्मनी येथील संशोधक डॉ. कार्लोस मचाडो म्हणाले, अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमधून जागतिक पातळीवरील संशोधकांच्या संशोधनाला चालना मिळते़ तसेच एकमेकांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण करुन जागतिक दर्जाचे संशोधन सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते़ लोणीसारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयाने ही आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन मोठे यश संपादन केले आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़ एस़ एऩ पठाण म्हणाले, युवा संशोधकांनी वैज्ञानिक क्षेत्रात अधिकाधिक सखोल ज्ञान संपादन करुन देशातील मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहावे, असा संदेश दिला़महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी तीन दिवस चाललेल्या या परिषदेचा आढावा घेताना सांगितले की, महाविद्यालयाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वीपणे पार पाडली. या परिषदेमध्ये विविध देशातील संशोधक अभ्यासकांनी सहभागी होऊन महाविद्यालयाच्या प्रयत्नांना यशस्वी केले़ महाविद्यालय सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, अ‍ॅड़ अप्पासाहेब दिघे, सहसचिव डॉ़ जे़ आऱ भोर, डॉ़ पी़ जी़ रेड्डी, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य मतकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्राचार्य उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक डॉ. अनिल कुऱ्हे यांनी परिषदेचा गोषवारा घेतला. डॉ़ अनिल वाबळे, प्रा़ संगीता धिमते, प्रा़ वैशाली मुरादे यांनी सूत्रसंचालन केले़ प्रा़ दत्तात्रय थोरात यांनी आभार मानले़ (वार्ताहर)