नरेंद्र मोदींकडून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:36 IST2019-04-12T13:36:12+5:302019-04-12T13:36:24+5:30
महाराष्ट्र आमचं सरकार मोठं काम करत आहे. पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन्याचा आमचा संकल्प आहे.

नरेंद्र मोदींकडून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण, पण...
अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच आपल्या भाषणात अजित पवारांचा उल्लेख केला आहे. अहमदनगरमधील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मोदींनी अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण करून दिली. मुंबईत प्रभाकर देशमुख या शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या उपोषणाचा संदर्भ देत अजित पवार यांनी धरणात पाणी नाही, तर मी लघवी करायची का? असे म्हटलो होते. मोदींनी पाण्याबद्दल बोलताना आपल्या सभेत अजित पवारांचा उल्लेख केला.
महाराष्ट्र आमचं सरकार मोठं काम करत आहे. पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन्याचा आमचा संकल्प आहे. देशातील नद्या आणि समुद्राचे पाणी कशाप्रकारे वापरात येईल, यासाठी हे मंत्रालय स्थापन करण्यात येईल. एकीकडे आमचं महायुतीच सरकार जलसिंचनची मोठी काम करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस सरकारचे घोटाळे आणि अजित पवारचे निर्लज्ज वक्तव्य आहे, असे म्हटले. अजित पवार यांच नाव न आठवल्याने मोदींनी 'अजित परिवार के शर्मनाक बयान है', असे मोदींनी म्हटले. मोदींच्या या बोलण्याचा रोक अजित पवार यांनी धरणातील पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्याकडेच होता.
पक्षाचं नाव 'राष्ट्रवादी', पण शरद पवार देश तोडणाऱ्यांसोबत; मोदींचा पुन्हा 'स्ट्राईक' https://t.co/dX1tKD1Ua6
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 12, 2019
उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी इंदापूरच्या निंबोळी गावातील सभेमध्ये बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही जनतेची माफी मागितली होती. तर अजित पवार यांनीही आत्मक्लेष केला होता. मात्र, मोदींनी नगरमधील सभेत अजित पवारांच्या त्या वक्तव्याची आठवण करुन दिली. निंबोळीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी धरणात पाणी नाही, तर तेथे लघवी करायची का? लघवी करायलाही पाणी प्यावे लागते, असे बेताल वक्तव्य केले होते.