शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

प्रारुप मतदार यादीवरच नगरपंचायतीच्या निवडणुका थांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील पाच नगरपरिषदा व नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली; मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटामुळे ही ...

अहमदनगर : जिल्ह्यातील पाच नगरपरिषदा व नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली; मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटामुळे ही प्रक्रिया प्रारुप मतदार यादीवरच थांबली आहे, त्यामुळे या निवडणुकाही आता लांबल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर, शेवगाव आणि जामखेड येथील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठी फेब्रुवारी-मार्चमध्ये या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. राजकीय पक्षांनीही मेळावे, सभा घ्यायला सुरुवात केली होती; मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली. त्यानंतर जूनमध्ये ही लाट ओसरल्यानंतर या निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती; मात्र कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येणार असल्याने आगामी निवडणुकाही पुन्हा लांबणीवर गेल्याने राजकीय कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला आहे.

-------------

नगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. पुढील प्रक्रिया सुरू करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे प्रारुप मतदार यादी जैसे थे आहे.

-गणेश शिंदे, प्रशासन अधिकारी, नगरपालिका विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय