शॉर्टसर्कीटमुळे मायलेकाचा मृत्यू

By Admin | Updated: September 26, 2014 00:17 IST2014-09-26T00:09:20+5:302014-09-26T00:17:31+5:30

राहुरी : शॉर्टसर्कीटमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता राहुरी फॅक्टरी येथे समर्थनगरमध्ये घडली.

Mylake's death due to shortSearch | शॉर्टसर्कीटमुळे मायलेकाचा मृत्यू

शॉर्टसर्कीटमुळे मायलेकाचा मृत्यू

राहुरी : शॉर्टसर्कीटमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता राहुरी फॅक्टरी येथे समर्थनगरमध्ये घडली.
मयतामध्ये रोहन संजय मगर (वय १४) व आई सुनीता संजय मगर (वय ३८) यांचा समावेश आहे़ गुरुवारी दुपारी घरात शॉर्टसर्कीट झाल्यामुळे धूर निर्माण झाला़ संजय मगर हे शिक्षक असून ते केंदळ येथे गेलेले होते़ शेजारी असलेले जोसेफ जॉर्ज यांनी आरडाओरड करीत घराकडे धाव घेतली़ मात्र घराचे दरवाजे व खिडक्या बंद असल्याने मदतीला अडसर निर्माण झाला़ जमा झालेल्या लोकांनी खिडकीच्या काचा व दरवाजा तोडून घरात प्रवेश केला़ रोहन व संजय यांना तातडीने राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले़ मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण या करीत आहेत़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mylake's death due to shortSearch