शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

पद्मश्री विखे पुरस्काराने मुटकुळे, लिंबेकर यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी साहित्य, कलागौरव आणि प्रबोधनात्मक कार्य ...

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी साहित्य, कलागौरव आणि प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते नारळी पौर्णिमेला हे पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोना संकटामुळे मागील वर्षी पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. यंदा पुरस्कारार्थींना त्यांच्या घरी जाऊनच सन्मानित करण्याचा निर्णय आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवाराने घेतला.

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या ''पुन्हा क्रांतिज्योती'' या साहित्यकृतीस आणि संगमनेर महाविद्यालयातील प्रा. अशोक लिंबेकर यांच्या ''वय कोवळे उन्हाचे'' या ललित लेखसंग्रहास अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या दोन्ही पुरस्कारर्थीचा डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे, डॉ. दिनकर गायकवाड, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर यांनी प्रवरा परिवाराच्या वतीने निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान केला.

___

फोटो नेम ०६०९२०२१ डॉक्टर सोमनाथ मुटकुळे पुरस्कार प्रदान,

ओळ : डॉ. सोमनाथ मुटकुळे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रवरा परिवाराच्या वतीने गौरविण्यात आले.