Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:01 IST2025-09-29T12:59:50+5:302025-09-29T13:01:07+5:30
Ahilyanagar Protest News: अहिल्यानगरमध्ये मु्स्लीम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना करण्यात आल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
Ahilyanagar News in Marathi: मुस्लीम धर्मगुरुच्या नावाची रांगोळी काढून त्याचे विटंबना करण्याता आल्याच्या प्रकारावरून अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला. विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर आले. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी रास्ता रोको आणि लाठीचार्जची घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरुंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी आंदोलकांना समजावले, पण...
सोमवारी याचे पडसाद उमटले. विटंबना करणाऱ्या संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोठला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस समजून सांगत होते.
तरुण काही ऐकत नव्हते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते. मात्र आंदोलक ते मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
३० ते ३५ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान, हा तणाव आता शांत झाला असून पोलिसांनी संबंधित युवकाला व आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितले की, जमावाला पांगवण्यासाठी हा लाठी चार्ज करण्यात आला. याप्रकरणी 30 ते 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.