शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

नगर अर्बन बँकेची ७ डिसेंबरला निवडणूक

By admin | Updated: October 28, 2014 01:00 IST

अहमदनगर : अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.२८) पासून सुरू होणार आहे. बँकेची ७ डिसेंबरला मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

अहमदनगर : अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.२८) पासून सुरू होणार आहे. बँकेची ७ डिसेंबरला मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान अर्बन बँकेसंबंधीचे सर्व आरोप सहकार खात्याने फेटाळून लावले असून बँकेचा कारभार कायदेशीर असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. बँकेच्या हिताचे निर्णय घेतल्याने अध्यक्षांसह संचालकांना दोषमुक्त करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी एका आदेशाद्वारे बँकेला चौकशीमुक्त के ले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने या आदेशाची आम्हाला माहिती नव्हती. सदर आदेश टपालाने मिळाला. त्यानंतर माहिती मिळविली. त्यामुळे आदेशाची माहिती देण्यास उशीर झाल्याचे बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी पत्रकारांना सांगितले.कर्जवसुलीमध्ये दिलेली सूट, वाहन खरेदी व्यवहार, काष्टी शाखेतील सोनेतारण कर्ज आदी व्यवहारांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांवरून बँकेला विरोधी संचालकांनी लक्ष्य केले होते. बँकेच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि सहकार खात्याकडे याचिका दाखल केल्या होत्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी न्यायालयाने बँकेला दोषमुक्त केले होते. त्यानंतर आता सहकार खात्यानेही २५ सप्टेंबरला एका आदेशाद्वारे बँकेविरुद्ध केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व कागदपत्रांची व दाखल केलेल्या पुराव्यांची पाहणी केल्यानंतर चौकशी अधिकारी यांनी बँकेच्या काही संचालकांना दोषी ठरविले असले तरी बँकेच्या कर्जवसुलीच्या प्रयत्नामुळे बँकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये कोणत्याही प्रकारचे गंभीर आक्षेप नमूद केले नाहीत, असे खासदार गांधी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)