शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो; पावसाचा जोर वाढला        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 18:17 IST

पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.

राहुरी : पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.   गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे़. दुपारी मुळा धरणाच्या मो-यावरून पाणी पडू लागले़.  त्यामुळे मुळा धरणातून दुपारी दोन मो-यातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. त्यानंतर ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे़. कोतूळ येथे अद्याप पावसाची नोंद झालेली नाही़. कोतूळ येथे यंदा ९९६ मिमी, मुळानगर येथे ४७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ६२८० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले़. डाव्या कालव्यातून ७९२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे़. याशिवाय मुळा धरणातून जायकवाडीकडे ३ हजार ८९६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलेले आहे़.मुळा धरणाच्या तीन मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. यंदा पहिल्यांदाच १५ आॅगस्टपूर्वी मुळा धरण भरले होते़. मधल्या भागात पावसाने हजेरी लावल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़. त्यामुळे नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे़. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू आहे, असे मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.बंधारे पूर्ण भरणारमुळा नदीपात्रात असलेले बंधारे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते़. मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़. मुळा धरणात सध्या २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़. बंधारे भरणार असल्याने नदीकाठी असलेल्या शेतीसाठी आवर्तन लाभदायक ठरणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर