शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
4
‘वाह मोदीजी वाह! देशाला बर्बाद तुम्ही करायचं आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
5
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
6
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
7
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
8
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
9
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
10
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
11
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
12
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
13
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
14
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
15
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
17
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
18
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
19
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
20
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
Daily Top 2Weekly Top 5

शिरसगाव-तीळवणी उपबाजार समितीत चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST

शिरसगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिरसगाव-तीळवणी येथे उपबाजार समिती स्थापन करण्यात आली. या उपबाजार समितीत कोपरगाव ...

शिरसगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिरसगाव-तीळवणी येथे उपबाजार समिती स्थापन करण्यात आली. या उपबाजार समितीत कोपरगाव बाजार समितीपेक्षा जास्त प्रमाणात कांद्याची आवक होत असते.

योग्य भाव, रोख पेमेंट अशा प्रकरच्या जलद सुविधेमुळे शेतकऱ्यांची पसंती उपबाजार समिती शिरसगाव-तीळवणी करत आहे. पण सात दिवसापूर्वी सलग तीन तास पाऊस पडत होता. उपबाजार समितीत लिलावाच्या जागेत गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले होते. जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याने गाड्या चिखलात फसत होत्या. ओपन लिलाव पद्धत असल्याने भर पावसात लिलाव होणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी पत्र्याचे शेड मारण्याची गरज आहे. खाली जमिनीवर माती असल्याने चिखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. तरी त्या ठिकाणी मुरूम टाकून देण्याची मागणी तेथील व्यापारी संघटनेने केली आहे.

.............

उपबाजार समितीत पावसामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्याचे पावसाच्या दिवसात हाल होत आहे. लिलाव करता येत नाही. अडचणी बाजार समितीने सोडवाव्यात, यावर तोडगा काढण्यात यावा.

- राजेश मोरे, कांदा व्यापारी, शिरसगाव

.............

कोपरगाव तालुक्यात उपबाजार समिती स्थापन झाल्याने कांद्याची आवक वाढलेली दिसत आहे. लाखोंचा शेअर्स बाजार समितीस जमा होत आहे. मग तिथे शेतकऱ्यांसाठी सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण करावे, पावसाच्या दिवसात शेतकऱ्यांना निवाऱ्याची सोय करावी. पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शौचालय बांधवावे व लिलावास जागा कमी पडत असल्याने जागा वाढवावी.

- दिलीप भुजाडे, शेतकरी, आपेगाव

...................

आवारात मुरूम टाकून सोलिंग करून भक्कम करण्यात येणार आहे. दोन दिवसात कामास मंजुरी मिळणार असून पुढील दहा

दिवसात कामास सुरुवात होईल. आपण त्या जागेत नवीनच गेलो आहे. त्यामुळे कामासाठी परवानगी काढणे महत्वाचे असते. जसजशी अडचण निर्माण होईल.तसतशी सोय उपलब्ध केली जाईल.

- संभाजी रक्ताटे, सभापती कोपरगाव बाजार समिती

.............२५शिरसगाव

शिरसगाव-तीळवणी उपबाजार समितीच्या आवारात चिखलच चिखल झालेला दिसत आहे.