कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग, वनसंपत्तीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 14:28 IST2021-03-02T14:27:26+5:302021-03-02T14:28:20+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत. आगीत एक हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

Mountain fire in Kolgaon, Chikhali Shivara, major damage to forest resources | कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग, वनसंपत्तीचे मोठे नुकसान

कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग, वनसंपत्तीचे मोठे नुकसान

श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत. आगीत एक हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड यांनी वन विभागाला आगीची माहिती दिली. वनरक्षक हरीश मुंढे, अनंत तिवारी त्यांचे सहकारी घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले. त्यांना चिखली, कोळगाव परिसरातील नागरिकांनी मदत केली.

 

 

Web Title: Mountain fire in Kolgaon, Chikhali Shivara, major damage to forest resources