शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये मोर्चा,कर्जतमध्ये उपोषण

By admin | Updated: January 14, 2016 23:04 IST

पारनेर : इतर विविध प्रश्नी पारनेर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने गुरूवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

पारनेर : पारनेर तालुक्यात ‘महावितरण’ कडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, रोहित्रे जळाल्यानंतर दुरूस्ती व वाटपात होणारा दुजाभाव, दूधभाववाढ, दुष्काळी गावांमध्ये अनेक गावे वंचित राहिल्याने त्याचे फेरसर्व्हेक्षण करावे, दरोडे, चोऱ्यांचा तपास लावावा यासह इतर विविध प्रश्नी पारनेर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने गुरूवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. राष्ट्रवादीचे युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर येथील महात्मा फुले चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. लाल चौक, मुख्य शिवाजी पेठ मार्गे मोर्चा पारनेर तहसीलवर धडकला. मोर्चात दुधाचे भाव वाढवा, शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा, सबका साथ सबका विकास, शेतकरी केला भकास असे फलक झळकले. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या. पारनेर तालुक्यात वीजप्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी स्थितीत अनेक गावांची पीकआणेवारी जास्त लागल्याने ते दुष्काळी सवलतींपासून वंचित आहेत, असे झावरे यांनी निदर्शनास आणून दिले. अशोक सावंत, संजीव भोर यांनीही वाळुचोरांवर कारवाई करताना पोलीस व तहसीलकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. यावेळी सबाजी गायकवाड, अशोक सावंत, सभापती अरूण ठाणगे, उपसभापती भाऊ लामखडे, सोन्याबापू भापकर, प्रशांत गायकवाड, पोपट पवार, दीपक नाईक, विलास मते, योगेश मते, विक्रमसिंह कळमकर, पोपट शेटे, बबलू रोहोकले, संदीप कपाळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)चिचोंली काळदात येथे टँकरची मागणीकर्जत : कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच इतर प्रश्नी कर्जत तालुका काँग्रेस तसेच चिंचोली काळदात येथील ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर सुरू करावा, या मागणीसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांना चारा, शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी, कमांडची अट रद्द करावी, पाण्याचा टँकर मिळावा, प्रत्यक्ष पहाणी करून आणेवारी जाहीर करावी, कर्जत बसस्थानक परिसर स्वच्छ करावा, शालेय संगणक फी रद्द करावी. टँकर घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी कर्जत तालुका काँग्रेस समितीने उपोषण सुरू केले आहे. उपोषणास तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपसभापती प्रकाश शिंदे, पं.स. सदस्य किरण पाटील, युवा नेते संतोष धुमाळ, ‘त्रिमूर्ती’चे अध्यक्ष महेंद्र गुंड, सतिष पाटील, तात्यासाहेब ढेरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रीक, बापूसाहेब काळदाते आदी सहभागी झाले आहेत.चिंचोली काळदात येथे टँकर मंजूर करावा यासाठी उपसरपंच रघुनाथ काळदाते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणास बसलेल्यांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. हंडे घेऊन महिला या उपोषणात सहभागी झाल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमारराष्टवादीच्या मोर्चाचे रूपांतर पारनेर तहसीलसमोर गेल्यावर ठिय्या आंदोलनात झाले. यावेळी सुजित झावरे यांच्यासह उपस्थितांनी ‘महावितरण’,पोलीस ,महसूल, कृषी, वन विभाग यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पोलिसांनी दारूबंदी विरोधात व अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरु करावी, आमच्यासह कोणाचाही दूरध्वनी आलातरी अशा लोकांना सोडू नका, असेही झावरे यांनी सांगितले. ‘महावितरण’चे उपअभियंता ए.एस.माने यांनी धोत्रे येथील वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात येईल, जळालेली रोहित्रे लवकर दुरूस्त केले जातील, असे आश्वासन दिले. कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी सर्वांना शेततळे दिली जातील, असे सांगितले. अशोक सावंत यांनी रेशनचे धान्य शिरूरच्या व्यापारी पेठेत विक्री होत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.पीक आणेवारीचे पुन्हा सर्र्वेक्षणपारनेर तालुक्यात चुकीच्या पध्दतीने पीकआणेवारी लागली असल्याने सवलतींपासुन अनेक गावे वंचित राहत असल्याने पीक आणेवारीचे पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी जि.प. सदस्य सुजित झावरे यांनी केली. तहसीलदार भारती सागरे यांनी उर्वरीत गावांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल. त्यासाठी ग्रामपंचायत व गावात माहिती देऊन पीकआणेवारीसाठी सेवक जातील असे स्पष्ट केले.