शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या गडाला मोदींचाच ‘अंडरकरंट’

By admin | Updated: March 20, 2024 11:15 IST

पा रंपारिक युतीचे प्राबल्य असलेल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातही अपेक्षेप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनीच आघाडी घेतली आहे.

 पा रंपारिक युतीचे प्राबल्य असलेल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातही अपेक्षेप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनीच आघाडी घेतली आहे. विकास कामांबाबत गांधी यांच्यावर तीव्र नाराजी असली तरी ‘अब की बार, मोदी सरकार’च्या सुप्त लाटेने गांधी यांना तारले. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी गांधी यांच्या प्रचाराकडे ढुंकुनही पाहिले नसले तरी नगर शहराने गांधी यांनाच आघाडी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांनीही राजळे यांचा दुरूनच डोंगर साजरा केला. तरुण मतदारांना आकर्षित करण्यातही राजळे यांना सपशेल अपयश आले. प्रचारासाठी येणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी नगर केवळ ‘विश्राम’गृहच ठरले. महापालिका निवडणुकीतील राजकारण, पैशांचा प्रभाव आणि ‘माळी-मराठा-मुस्लीम’ हा फॅक्टरही मोदी लाटेपुढे फिका पडला. युतीचे प्राबल्य असलेल्या शहरात आमदार राठोड यांचा प्रभाव, महापालिकेतील युतीचे नगरसेवक, माजी नगरसेवकांची संपर्क यंत्रणा कार्यान्वीत झाली नसल्याने गांधींना नगरमध्ये एक लाखाचा टप्पा पार करता आला नाही. त्यांना होमग्राऊंडवरच सेना-भाजपाशी संघर्ष करावा लागला. जिल्ह्याचे मुख्यालय असुनही नगरमध्ये ५६ टक्केच मतदान झाले. तरुण मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात युती-आघाडीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तरीही गांधी यांनी राजळे यांच्यापेक्षा ३८ हजार २६५ मते जास्त घेतली. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असुनही त्याचा राजळेंना फायदा झाला नाही. ‘आप’च्या दीपाली सय्यद आणि लोकशासन पक्षाचे बी. जी. कोळसे पाटील यांच्या कष्टाचे अपेक्षित चीज झाले नाही. त्यांच्यासह अन्य उमेद्वारांना डिपॉझिटही वाचविता आले नाही. आमदार राठोड हे तर गांधींचा नव्हे मोदीचा प्रचार करीत असल्याचे वारंवार सांगत राहिले. भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते नगरमध्ये प्रचार करण्याऐवजी शिर्डीत प्रचाराला गेले होते. अ‍ॅड. अभय आगरकर यांची शहरातील मोठी साथ गांधी यांना मिळाली. सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे नगरऐवजी शिर्डीतच तळ ठोकून होते.