शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्चात मिनी मंत्रालय नापास

By admin | Updated: August 20, 2014 23:27 IST

अहमदनगर: जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना निधी देऊनही तो खर्च केला जात नसल्याचे उघड झाले आहे़

अहमदनगर: विकास निधी पदरात पाडून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू असते़ परंतु त्यांना पुरेसा निधी मिळत नाही़ त्यामुळे अनेक योजना कागदावरच राहतात़ मात्र जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना निधी देऊनही तो खर्च केला जात नसल्याचे उघड झाले आहे़ अखर्चित दोन कोटींचा निधी तात्काळ परत करा, अशा सक्त सूचना जिल्हा नियोजन विभागाने जिल्हा परिषदेला दिल्या आहेत़ त्यामुळे खात्यावर जमा झालेला निधी परत करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढावली आहे़शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात़ जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला दरवर्षी कोट्यवधींचा निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन विभागातून हा निधी वितरीत होत असतो़ जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी निधी खर्चाबाबत आढावा घेतला जातो़ जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१२- १३ मध्ये जिल्हा परिषदेला १४२ कोटी ४० लाखांचा निधी देण्यात आला होता़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य, लघु पाटबंधारे, शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, यासारख्या विभागातील विकास कामांसाठी हा निधी होता़ मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने त्या अर्थिक वर्षात तो खर्च केला नाही़ जिल्हा परिषदेने गत ३१ मार्चपर्यंत १४० कोटी रुपये खर्च केले़ उर्वरित २ कोटींच्या निधीतील कामे जिल्हा परिषदेने मुदतीत पूर्ण केलीच नाहीत़ वेळोवेळी आढावा घेऊनही उपयोग झाला नाही़ अखेर निधींवरच पाणी सोडावे लागले असून, जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा असलेले दोन कोटी शासनाला परत केले जाणार आहेत़जिल्हा नियोजन विभागाने सन २०१३- १४ मध्ये जिल्हा परिषदेस १६२ कोटी ४० लाख रुपये वितरीत केले़ यापैकी जिल्हा परिषदेने ८२ कोटी २९ लाख खर्च केले़ उर्वरित ८० कोटी अजूनही खर्च झाले नाहीत़ हा निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेला ३१ मार्च २०१५ पर्यंतची मुदत आहे़ त्यात आता विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे़ दोन महिने अचारसंहितेत्े जाणार आहेत़ या काळात नवीन कामे सुचविता येणार नाहीत़ त्यामुळे उर्वरित पाच महिन्यांत ८२ कोटी रुपये जिल्हा परिषदेला खर्च करावे लागतील़ अन्यथा पुन्हा हा निधीही परत जाईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)