पुणतांब्यात भाजप, मनसेतर्फे बळीराजाच्या पुतळ्यात दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:50 IST2020-08-01T11:49:35+5:302020-08-01T11:50:19+5:30
पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले.

पुणतांब्यात भाजप, मनसेतर्फे बळीराजाच्या पुतळ्यात दुग्धाभिषेक
पुणतांबा : ऐतिहासिक अशा शेतकरी संपाचे गाव असलेल्या पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले.
पुणतांबा येथील ग्रामपंचायतीसमोर बळीराजाच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करीत दुधाचा अभिषेक घालण्यात आला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी दुधाला ३० रुपये हमीभाव द्यावा. १० रुपये अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी केली.
या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी, शेतकरी संपाचे शिलेदार धनंजय धोर्डे, बाळासाहेब चव्हाण, मनसे राहाता तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव, पुणतांबा मनसे शहर अध्यक्ष संदीप लाळे, संजय सोनवणे, विजय धनवटे, भाजप व मनसेचे कार्यकर्ते सामिल झाले होते.