शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

फेसबुक हॅक करून मानसिक छळ अन् आर्थिक लूट

By अरुण वाघमोडे | Updated: September 25, 2020 14:03 IST

अहमदनगर : सायबर गुन्हेगारांकडून फेसबुक अकाउंट हॅक करून मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली झाली आहे. येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक हॅकिंगच्या दिवसाला एक दोन तक्रारी दाखल होत आहेत. तांत्रिक गोष्टीच्या अज्ञानामुळे अनेक जण हॅकर्सच्या जाळ्यात अडकले आहेत.

भारतात फेसबुक हे अ‍ॅप्लीकेशन वापरणाºयांची मोठी संख्या आहे. सायबर गुन्हेगारांनी आॅनलाईन फसवणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून फेसबुककडे मोर्चा वळविला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून या फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. फेसबुक अकाउंट हॅक करुन त्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस हॅकर स्वत:कडे घेतात. युझरला त्याचा अ‍ॅक्सेस परत देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. पैसे नाही दिले तर त्याच्या फेसबुक अकाउंटवर अश्लील फोटो व व्हिडिओ अपलोड केले जातात. युजरच्या फेसबुक वरील फोटोंचे मॉर्फिंग करून त्याचे अश्लील फोटोत रूपांतर केले जाते. तसेच युजरच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारे त्याचे मित्र व मैत्रिणींना अश्लील भाषेत चॅट करून त्याची बदनामी करून त्यास मानसिक त्रास दिला जातो. या त्रासाला वैतागून अनेक जण या गुन्हेगारांना ते मागतील तेवढे पैसे पाठवून देतात.

पाच महिन्यात दीडशेपेक्षा जास्त तक्रारीयेथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये मागील चार ते पाच महिन्यांमध्ये फेसबुक हॅकिंग संदर्भात दीडशेपेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारदारांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यातील ९९ टक्के तक्रारी या आर्थिक फसवणुकीच्या संदर्भातील आहेत.

कोरोना उपचारासाठी मागितले जातात पैसेसध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सायबर गुन्हेगारांनी याचाही फायदा घेण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांचे फेसबुक अकाउंट हॅक करुन त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील सर्व मित्रांना ‘उपचारासाठी मला पैशाची नितांत गरज आहे’ असे मेसेज पाठवले जातात. मित्र अडचणीत आहे, असे समजून अनेक जण जास्त विचारपूस न करता त्याने पाठविलेल्या गुगल पे अथवा फोन पे नंबरवर काही रक्कम टाकून देतात. काही दिवसानंतर कळते की हा फेक मेसेज होता.

...अशी घ्यावी काळजीफेसबुक अकाउंटचा पासवर्ड हा मोबाईल नंबर, नाव व जन्मतारीख असा ठेवू नये. तसेच पासवर्ड वेळोवेळी बदलावा. फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या फेसबुकचे सेटिंग चेंज करून प्रोफाइल लॉकिंग ही सेटिंग ठेवावी आपले फोटो, पोस्ट, कमेंट बाबत प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन ओन्ली फ्रेंड्स सेटिंग करून घ्यावी जेणेकरून वैयक्तिक फोटो सार्वजनिक होणार नाहीत.

तांत्रिकदृष्ट्या सोशल मीडियाचा सुरक्षितरीत्या कसा वापर करावा याची प्रथम सर्वांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे. आपली फसवणूक होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. आपले अकाऊंट हॅक करून कोणी पैसे मागत असेल तर त्याला पैसे न देता त्यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.    - अरुण परदेशी, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी