शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: January 30, 2023 12:36 IST

अहमदनगर : एकीकडे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या आवारात एका शिक्षिकेचा गटशिक्षणाधिकारी यांनी विनयभंग केला आहे.

अहमदनगर : एकीकडे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या आवारात एका शिक्षिकेचा गटशिक्षणाधिकारी यांनी विनयभंग केला आहे. या प्रकरणी शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी तालुक्यातील एका शाळेचा विद्यार्थी पट कमी झाल्याने ती शाळा बंद पडली होती. त्यामुळे या शाळेवरील शिक्षिका अन्य शाळेमध्ये नियुक्ती मिळविण्यासाठी एक सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेतील गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कार्यालयात खेटे मारत होत्या. बुधवारी त्या जिल्हा परिषदेत आल्या होत्या. यावेळी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘तू किती दिवस चकरा मारतेस, तुझे काम व्हायचे असेल तर माझ्यासोबत चल’, असे म्हणून सदर शिक्षिकेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या प्रकरणी सदर शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून धनवे याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीईओंकडून दखलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. यापूर्वीही गटशिक्षणाधिकारी धनवे यांच्याविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळेच नवाल यांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. धनवेंवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.