शेतीचे गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:42+5:302021-02-05T06:35:42+5:30
शेतमजुरांची खऱ्या अर्थाने सबलीकरण झाले आहे. मजुरांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर स्लॅबची घरे बांधली आहे तर काहींनी पत्र्याची घरे ...

शेतीचे गणित कोलमडले
शेतमजुरांची खऱ्या अर्थाने सबलीकरण झाले आहे. मजुरांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर स्लॅबची घरे बांधली आहे तर काहींनी पत्र्याची घरे बांधली आहेत. शेतीत मजुरी करताना शेतीमधून रोजगार बरोबरच जनावरांसाठी गवत, सरपण, फळे, भाजीपाला ही शेतमजुरांना उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांपेक्षाही जास्त जनावरे शेतमजूराकडे आढळून येत आहेत. मजुरांना घरामध्ये भौतिक सुविधा टीव्ही सारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय दुचाकी ही मजुरांनी घेतल्या आहेत. याउलट शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
.....................
प्रती एकरमध्ये दर
कांदा खुरपणी -३०००
ऊस खुरपणी -४०००
कांदा लागवड -७५००
मका लागवड -२५००
ऊस लागवड -५५००
रानबांधणी ऊस - १०००
कांदा - १५००
घास - ६०००
...........
शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर अनेकदा रोजाने काम करण्यास तयार होत नाहीत. ते काम तोडून मागितले जाते. वाढती महागाई आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. उत्पन्नाचा निम्मा वाटा हा मजुरीवर खर्च होत आहे. अशा परिस्थितीमुळे शेतीचे लाखाचे बारा हजार असे चित्र पहावयास मिळत आहे.
- नरसिंह वराळे, शेतकरी, राहुरी