शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक वे ४२०’ कोठडीत

By admin | Updated: December 16, 2015 23:08 IST

अहमदनगर :सहली रद्द करून फसवणूक करणाऱ्या ‘मेक वे हॉलिडे’ या पर्यटन कंपनीचा मालक विजयभान रामेश्वर सिंग (रा. पुणे) याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती.

अहमदनगर : पर्यटक आणि इतर ट्रॅव्हल्स कंपनीचे ४८ लाख रुपये घेवून सहली रद्द करून फसवणूक करणाऱ्या ‘मेक वे हॉलिडे’ या पर्यटन कंपनीचा मालक विजयभान रामेश्वर सिंग (रा. पुणे) याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयाने चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई येथील ‘मेक वे हॉलिडे’ या कंपनीने पर्यटक आणि ड्रीम हॉलिडे या कंपनीकडून ४८ लाख रुपये जमा करून घेतले. त्यानंतर अचानक सहली रद्द केल्या. त्यामुळे पर्यटकांची फसवणूक झाली. या प्रकरणी नगर येथील आनंद टूर्स कंपनीच्या सरिता साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात झेनी विजयभान सिंग उर्फ सोनाली डिसिल्व्हा वसदर आणि विजयभान रामेश्वर सिंग (रा. पुणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे-मुंबई येथे पथक पाठवून आरोपीला जेरबंद केले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता त्याने पर्यटक व ट्रॅव्हल्स कंपनीचे पैसे घेतल्याची कबुली दिली. सिंग याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी सिंग याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी) ड्रीम हॉलिडेजच्या गुन्ह्यात समावेश तीन-चार महिन्यांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात काही पर्यटकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ड्रीम हॉलिडेज या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातही सिंग याचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्याचाही तपास सुरू असून सिंग याने आणखी कोणाची फसवणूक केली, पर्यटकांचे किती पैसे घेतले, कोणकोणत्या सहलींचे नियोजन रद्द झाले होते, याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी तथा कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी सांगितले.