महाराष्ट्राला पाणीदार बनवा - आमिर खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:38 IST2018-04-11T13:37:08+5:302018-04-11T13:38:23+5:30
पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत टँकर बंद झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले़

महाराष्ट्राला पाणीदार बनवा - आमिर खान
पाथर्डी : पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत टँकर बंद झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले़
तालुक्यातील जोगेवाडी येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिनेअभिनेता आमिर खान व किरण राव यांनी गावक-यांसह श्रमदान केले़ यावेळी श्रमदानावर आधारित लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले. आमिर खान यांच्यासमवेत किरण राव, बाळू शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनीही श्रमदान केले. गावाला तीनही बाजूने डोंगर असल्याने सीसीटी बंधा-यांची कामे केली जाणार आहेत.
जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असून, मंगळवारी दुपारी दीड वाजता पाथर्डी येथील हेलिपॅडवर आमिर खान यांचे आगमन झाले़ यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती़ उपसरपंच बाळासाहेब आंधळे यांनी आमिर खान यांचे स्वागत केले. त्यानंतर कारने जोगेवाडी गाठून आमिर खान यांनी गावकºयांशी मुक्त संवाद साधला़ आमिर खान म्हणाले, तुमच्या गावात येऊन अतिशय चांगलं वाटलं. तुम्ही खूप काम चांगल काम करत आहात़ पाणी फाउंडेशनचा वॉटर कप तुम्ही जिंक ा, अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. गावासाठी पाणी उपलब्ध करून देणं खूप चांगलं काम आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा़ एका गावाने चांगल काम केलं, तर अनेक गावांना प्रेरणा मिळते़
ग्रामदैवत काशिनाथाच्या मंदिरात आमिर खान यांनी आरती करून श्रमदान केले़ गावकरी ४५ दिवस श्रमदान करणार आहेत़ प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी आमिर खान यांचे स्वागत केले़ तहसीलदार नामदेव पाटील यांनी आभार मानले.