महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडची जंगी मिरवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 12:20 IST2023-05-01T12:20:22+5:302023-05-01T12:20:56+5:30

संत शेख महंमद महाराज मंदीरात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Mahila Maharashtra Kesari Bhagyashree Fund War Procession in shrigonda | महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडची जंगी मिरवणूक 

महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडची जंगी मिरवणूक 

श्रीगोंदा(जि. अहमदनगर):  कोल्हापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकाविणाऱ्या भाग्य फंड व भाग्यश्रीचे हनुमंत (वडील) पुजा( आई) इतर महिला मल्लांची श्रीगोंदेकरांनी जंगी मिरवणूक काढून तोफाची सलामी देत आनंदोत्सव साजरा केला. या कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याच्या महिला इंटरनॅशनल कुस्ती संकुलातील भाग्यश्री फंड बरोबर  पदकांची लयलूट करणाऱ्या वेदांतिका पवार  श्रुखलारतन पारखी, धनश्री फंड पल्लवी पोटफोडे, सोनिया चरक साक्षी इंगळे यांच्या पाठीवर ग्रामस्थांनी कौतुकाची थाप मारली. 

संत शेख महंमद महाराज मंदीरात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना भाग्यश्री फंड म्हणाली,  की श्रीगोंदेकरांच्या सदिच्छा पाठिमागे उभ्या आहेत. या यशात माझ्या आई वडीलांबरोबर माझे प्रशिक्षक व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. आॅलपिक स्पर्धा डोळ्यासमोर सराव चालू आहे. यावेळी आप्पासाहेब सोनवणे सतिश मखरे सविता सांळुके, डफळ सर उपस्थित होते.

Web Title: Mahila Maharashtra Kesari Bhagyashree Fund War Procession in shrigonda