Maharashtra Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात जोराचा पाऊस, अनेक गावांना झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 22:50 IST2025-10-26T22:48:57+5:302025-10-26T22:50:59+5:30
श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे ४० ते ६० मिलिमीटर पावसाची अनेक ठिकाणी नोंद झाली.

Maharashtra Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात जोराचा पाऊस, अनेक गावांना झोडपले
अहिल्यानगर : जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. श्रीरामपूर, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना पावसाने चांगलेच झोडपले. राजूर, भंडारदरा परिसरातही पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता.
पुणतांबा येथे पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यात विसापूर, कोळगाव येथेही हलका ते मध्यम पाऊस झाला.
राजूर परिसरात मागील चार दिवसांपासून सलग जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले.
सुमारे ४० ते ६० मिलिमीटर पावसाची अनेक ठिकाणी नोंद झाली. वडाळामहादेव येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस झाला. या भागात सोयाबीन वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.