Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:16 IST2019-10-22T05:02:52+5:302019-10-22T06:16:46+5:30
Maharashtra Election 2019: माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा
अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीत भाजपचा एक कार्यकर्ता जखमी झाला, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डीत मतदान करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सायंकाळी पाचपर्यंत ६५ टक्के मतदान झाले होते. नेवासा मतदारसंघात सर्वाधिक, तर अहमदनगर शहर मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले.
श्रीगोंदा मतदारसंघात टाकळी कडेवळीत येथे पैसे वाटप करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांची सुटका केली. अकोले तालुक्यात पाच मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडले होते.